विशुद्धेचा सहकार या मंदिरा लाभला | म्हणूनची प्रतीवर्षी हा ध्वज उंचावला || असा सहकार उंच उंच होण्यासाठी | एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ || या संत वाणीनुसार कै. बाबुराव डाकवे (काका) यांनी संस्थेचे काम चोख व पारदर्शी केले.
याच कालावधीत संस्थेने सलग तीन महिन्यात नवीन तीन शाखा निर्माण केल्या. दिनांक ३०/०९/२००१ रोजी मानखुर्द शाखेचे उद्घाटन माथाडी नेते शंकरराव येळवे (आप्पा) यांच्या हस्ते, दिनांक २६/१०/२००१ रोजी भांडूप शाखेचे उद्घाटन कायद्याचे सल्लागार अँड श्री.अशोक पोफळे यांच्या हस्ते करण्यात आले. याच कालावधीत संस्थेस २५ वर्षे पूर्ण झाल्याने रंगभवन, धोबीतलाव या ठिकाणी ‘रौप्य महोत्सव’ सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला होता.
सन २००६ ते २००८ या कालावधीत पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून कै.बाबुराव डाकवे (काका) यांनी कामकाज पाहिले. या कालावधीत नवीन संचालक म्हणून जगन्नाथ थोरात यांची साथ मिळाली. दिनांक ०३/११/२००८ रोजी तळमावले येथे शाखा सुरु करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन तत्कालीन आमदार विलासरावजी पाटील (काका) यांच्या हस्ते करण्यात आले. ३१/०३/२००९ संस्थेचे खेळते भागभांडवल रुपये १३८६.३६ लाख झाले. सभासद संख्या ११५३७ एवढी झाली. संस्थेची तळमावले येथे स्वमालकीची इमारत असावी याचे पहिले पाहुल म्हणून या ठिकाणी मोकळा भुखंड खरेदी करण्यात आला.
सन २००९ ते २०१० व सन २०१२ ते २०१६ या कालावधीत पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून श्री.आत्माराम थोरात (आबा) यांनी कामकाज पाहिले. या कालावधीत नवीन संचालक म्हणून दगडु लांबोर व चंद्रकांत रामिष्टे यांची साथ मिळाली. ३१/०३/२०१७ संस्थेचे खेळते भागभांडवल रुपये २४७७.६१ लाख झाले. सभासद संख्या १२०६९ एवढी झाली. इवलेसे रोप लावियले द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी || या उक्तीप्रमाणे संस्थेची प्रगती गतिमान होण्यास या कालावधीत सुरुवात झाली.
सन २०१७ ते सन २०२५ या कालावधीत तरुण तडपदार अध्यक्ष म्हणून सुशिक्षित आणि कार्पोरेट ऑफिसला काम करित असलेले श्री.सुभाष बाबुराव बावडेकर यांनी कामकाज पाहिले. या कालावधीत नवीन संचालक म्हणून श्री. हणमंत मोळावडे, श्री. उत्तम राजे, सौ. अनिता देसाई, श्री.अशोक डाकवे, श्री.दिलीप डाकवे, श्री.आशिष पवार, अशोक चव्हाण, श्री.सुरेश मस्कर, श्री.लक्ष्मण येळवे, सौ.भारती डाकवे, श्री.ईश्वर भिंगारदेवे व श्री.दगडू लांबोर यांची साथ मिळाली. दि.३१/०३/२०२५ संस्थेचे खेळते भागभांडवल रुपये ४०१८.७३ लाख झाले. सभासद संख्या २२३२० एवढी झाली. याच कालावधीत कै.बाबुराव डाकवे यांचे तळमावले येथे संस्थेचे नावे भवन असावे हे स्वप्न पूर्ण करण्यात आले. या ठिकाणी ६०/४० या तत्वावर तीन मजली इमारत बांधण्यात आली.
कर्मचारी व ठेव वसुली प्रतिनिधी
संस्थेच्या जडणघडणीत वरील नमूद अध्यक्ष, संचालक मंडळासोबत कर्मचारी यांचाही वाटा मोठा आहे. कर्मचारी म्हणून कै.भगवान इंगळे, कै.कुंडलिक घारे, कै.यशवंत पवार, कै.जयशिंग चव्हाण, मारुती शिरसाट, श्री.दिनकर सावंत व श्री.भरत सावंत या माजी कर्मचार्यां बरोबरच विद्यमान कर्मचारी श्री.विठ्ठल डाकवे, श्री.सुरेश कदम, श्री.राजाराम डाकवे, श्री.तानाजी घराळ, श्री.धनाजी बावडेकर, श्री.शशिकांत मोरे, श्री.मोहन डाकवे, श्री.अशोक डाकवे, श्री.रामचंद्र पुजारी, श्री.विजय रावराणे, श्री.लक्ष्मण नांगरे, श्री.तानाजी कात्रे, श्री.लक्ष्मण कात्रे, श्री.प्रदिप थोरात, श्री.सुनील शेवाळे, श्री.दिपक चोरगे, श्री.दिनेश डाकवे आणि सौ.प्रिया मस्कर या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. सन २००५ नंतर ते आजपर्यंत संस्थेची प्रगती अधिक गतिमान करण्याचे काम व्यवस्थापिका मिनाक्षी जाधव या करित आहेत.
संस्थेच्या प्रगतीमध्ये ठेव वसुली प्रतिनिधी यांचाही मोलाचा वाटा आहे. दिनांक ३१/०३/२०२५ अखेर संस्थेच्या विविध शाखांमध्ये २८ प्रतिनिधी कार्यरत असून संस्थेचा नावलौकिक कायम ठेवण्याचे काम चोख करित आहेत. सध्या श्रीमती.मिनाक्षी पाटील, सौ. आशा मस्कर, श्री. भानुदास कात्रे, सौ. वर्षाराणी थोरात, सौ. विमल मोळावडे, श्री. प्रकाश निगडेकर, सौ. सीमा डाकवे, श्री.बाळकृष्ण मस्कर, सौ.रुपाली पुजारी, श्री.राजेंद्र गडकर, श्री.स्वप्नील येळवे, सौ.नंदा नांगरे, श्री.आनंदा नांगरे, सौ. संगीता बावडेकर, श्री.पांडुरंग पाटील, श्री.राजेंद्र कणसे, श्री.श्रीकांत नांगरे, सौ.कोमल खेडेकर, श्री.राजाराम येळवे, श्री.पंढरीनाथ सुपनेकर, श्री.सदाशिव पाटील, श्री.सौरभ पाटील, श्री.निवास जाधव, सौ.सुरेखा कात्रे व श्री.वसंत रोडे हे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
१ जुन २०२५ पासून सौ. भारती डाकवे या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचे खेळते भांडवल रु. ४३.८६ कोटी असून रु. ५९.१७ कोटी संमिश्र व्यवसाय आहे. संस्थेने कामोठे (नवी मुंबई) येथे आठवी शाखा सुरु केलेली आहे. संस्थेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोठ्या दिमाखात ‘सुवर्ण महोत्सव’ सोहळा साजरा केला. या सोहळ्यास माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री, माजी खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. सदर सोहळा संस्थेच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्षा म्हणून लाभलेल्या सौ. भारती डाकवे यांच्या देखरेखीखाली संपन्न करण्यात आला.
जय हिंद || जय महाराष्ट्र || जय सहकार ||
सौ. भारती डाकवे
विद्यमान अध्यक्षा
आमचे ध्येय
सभासदांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुलभ आर्थिक सेवा उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावणे.
आमची दृष्टी
सहकार क्षेत्रात आधुनिक, सक्षम आणि सभासद-केंद्रित अग्रगण्य संस्था बनणे.आमची मूल्ये
- विश्वास
- पारदर्शकता
- सेवाभाव
- प्रामाणिकपणा
- सभासद हित प्रथम
संस्थेची वैशिष्ट्ये
- कमी कालावधीमध्ये सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेली एकमेव संस्था
- सभासद ठेवीदारांचा आदरपूर्वक मानसन्मान
- विश्वास व पारदर्शकता हे आमचे ध्येय
- सभासद ठेवीदारांची मनोभावे सेवा हे आमचे कर्तव्य
- सभासदांसाठी एस.एम.एस (मॅसेज) ची सुविधा उपलब्ध
- आपुलकीची विनम्र व तत्पर सेवा
- संस्थेचे संपूर्ण कामकाज संगणीकृत
- विश्वास आणि पारदर्शकता हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे
- संस्थेचा ६० कोटीहुन अधिक संमिश्र व्यवसाय.
- प्रशासकीय कार्यालय व तीन शाखांची कार्यालये स्वमालकीची.
- बँकिंग क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले संचालक मंडळ.
- प्रशिक्षित, अनुभवी व कर्तव्यदक्ष कर्मचारी वृंद व सस्मित सेवा.
- महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या ‘दिपस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित.
संस्थेची मुल्ये
- सहकार मुल्य – सहकार मूल्यांची जपणूक व सभासदांची आर्थिक प्रगती.
- विश्वास – प्रत्येक सभासदाशी विश्वासाच नातं.
- पारदर्शकता – व्यवहारांमध्ये प्रामाणिकता आणि स्पष्टता.
- सेवा – प्रत्येक सभासदाला तत्पर, कार्यक्षम आणि सौजन्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न.
- नवकल्पना – तांत्रिक साधनांचा वापर करून आधुनिक बँकिंगचा अनुभव.