कै. बाबुराव डाकवे स्मृति ठेव –
ही योजना सामाजिक आणि कौटुंबिक नाते दृढ व्हावे या हेतूने तयार करण्यात आली आहे. या योजनेत समाजातील होतकरू विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. या योजनेत ज्या दानशूर सभासदांना आपल्या प्रिय नातलगाचे नावे विद्यार्थी यांना त्यांचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने ठराविक रक्कम गुंतवणूक करता येईल.
या गुंतवणुकीच्या येणाऱ्या व्याजातून एक अथवा येणाऱ्या व्याज रक्कमेच्या आधारे विद्यार्थी यांना रोख किंवा वस्तु रुपात वार्षिक सभेत आपल्या प्रिय नातलगाचे नावे बक्षीस देण्यात येईल.
आपल्या प्रिय नातलगाची समाजात आठवण रहावी म्हणून दानशूर सभासदांनी या ठेवीत गुंतवणूक करावी अशी विनंती आहे.